सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर -शिरवळ मार्गावरील रामबाग चौकात रस्त्यावर भले मोठे खड्डे पडून पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. परिणामी संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना खड्डेमय रस्ता व रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यातील दुर्गंधीयुक्त पाण्यातून प्रवास करावा लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
सध्या भोर तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले जात आहे.त्यातच महत्त्वाच्या वाहतुकीच्या रामबाग चौकातून भोर-शिरवळ, शिरवळ- महाड अशी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते.खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालवणाऱ्या व्यक्तींच्या अंगावर दुर्गंधीयुक्त पाणी उडाल्याने वाहनचालकांमध्ये वादीवाद वाढू लागले आहे. तर वाहने चालवताना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने तात्काळ रामबाग चौकातील खड्डे बुजून पाणी रस्त्यावरून बाजूला काढण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.