Bhor News l भोर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अर्जुन खोपडे तर उपाध्यक्षपदी जीवन सोनवणे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी 
भोर तालुका पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी पत्रकार अर्जुन खोपडे तर उपाध्यक्षपदी जीवन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
          तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अंकुश वीर यांनी काम पाहिले. सर्वानुमते संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव स्वप्नीलकुमार पैलवान,खजिनदार दत्तात्रय बांदल,सोशल मीडिया अध्यक्ष किरण अंबिके, सोशल मीडिया उपाध्यक्ष कुंदन झांजले,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अध्यक्ष माणिक पवार, कार्यकारणी सदस्य किरण भदे, वैभव भुतकर, संजय इंगुळकर, विजय जाधव, सारंग शेटे, सूर्यकांत किंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत जाधव,बाळासाहेब शिंदे,विलास मादगुडे,निलेश खरमरे,इम्रान आत्तार, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के,विनय जगताप,तुषार सणस,सोमनाथ कुंभार,अनिस आतार उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष खोपडे म्हणाले पुढील काळात पत्रकार संघाच्या उन्नतीसाठी एकसंघ राहून विशेष प्रयत्न केले जातील.
Tags
To Top