सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : गणेश पवार
फलटण शहरानजीक असलेल्या जाधववाडी येथील ऑरेंज लॉज येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजवरून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई दि. २२ जुलै रोजी करण्यात आली. या कारवाईत लॉज चालक संशयित प्रविण रंगराव पवार (रा. विडणी, ता. फलटण) याला अटक करण्यात आली असून तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली सहा. पो. नि. रोहित फाणे आणि महिला पो. उपनिरीक्षक श्वेता पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.विश्वासू बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, फलटणमधील जाधववाडी येथील ऑरेंज लॉजवर छापा टाकण्यात आला. चौकशीत समोर आले की, लॉज चालक प्रविण पवार हा वेश्याव्यवसायासाठी महिलांना ग्राहकांसमोर सादर करत होता आणि त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशांवर स्वतःचा उदरनिर्वाह करत होता.
पोलिसांनी प्रविण पवार याला ताब्यात घेत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी पो.नि. हेमंतकुमार शहर, स.पो.नि. नितीन माने, पो.उ.नि. विजयामाला गाजरे, पोलीस अंमलदार रामचंद्र गुरव, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबळे, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, रविराज वर्णेकर, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, क्रांती निकम तसेच फलटण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राणी फाळके, अवघडे यांनी सहभाग नोंदवला.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पथकाचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे.