सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील भाटघर धरणातील पाण्याला अचानक हिरवा रंग आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व भीतीचं वातावरण पसरलं आहे.गेल्या चार ते पाच दिवसांपासून धरणाच्या पाण्याचा रंग बदलल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार सकाळच्या वेळी धरणाच्या पाण्यावर हिरवट तवंग तयार होतो.तो दुपारपर्यंत टिकतो.अचानक धरणाच्या पाण्याला हिरवा रंग आल्याने स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.या धरणातून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
धरणाच्या उत्तरेकडील बाजूस तसेच संगमनेर, माळवाडी आणि नऱ्हे गावांच्या किनाऱ्यावर पाण्याचा रंग बदलल्याचे निदर्शनास आले आहे.या जलाशयातून भोर शहरासह परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो.त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मात्र मच्छ वीभागाने धरणात काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत.त्यात टाकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असल्यामुळे शेवाळ वाढते. परिणामी पाण्याला हिरवा रंग येतो. हा रंग काही कालावधीनंतर पुरवत होतो असे सहाय्यक अभियंता श्रेणी -२ गणेश टेंगळे यांनी सांगितले.
वैज्ञानिक अहवालानंतरच स्पष्ट होणार खरे कारण
या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी जलाशयातील पाण्याचे नमुने या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले श्री आहेत. तसेच पाण्यातील तवंग हटवण्यासाठी त्वरित 1) उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना री दिल्या आहेत. भाटघर जलाशयातील पाण्यात झालेला बदल नागरिकांच्या आरोग्यदृष्टीने चिंतेचा विषय बनला असला, तरी प्रशासनाने तात्काळ कारवाई करत ने तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे.वैज्ञानिक अहवाल आल्यानंतरच याचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.