सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : गणेश पवार
फलटण शहरातील डीएड चौक शेजारील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळील मोकळ्या जागेत आज एक मानवी पायाचा पंजा आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सदर माहिती मिळताच फलटण शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, हा प्रकार नेमका कशामुळे घडला याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमागे कोणते गुन्हेगारी स्वरूप आहे का, याचा शोध घेतला जात आहे.पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले असून, विविध शक्यतांचा विचार करून तपास सुरू आहे.या प्रकरणाबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ फलटण शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.