Khandala News l पाडेगाव येथे हजरत पठाणशाह बाबांचा उरूस उत्साहात साजरा : हजारो भाविकांनी घेतले दर्शन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 नीरा : प्रतिनिधी 
पुरंदर तालुक्यातील नीरानजीक असलेल्या पाडेगाव (ता. खंडाळा) येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गाहचा ४१ वा ऊरूस उत्साहात साजरा करण्यात आला.शुक्रवारी (१८जुलै) पासून ते रविवारी (२० जुलै) या दरम्यान ऊरूसानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेेे होते. दरम्यान, दर्गाह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने परिसर उजाळून निघाला होता.
            पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या पाडेगाव (ता.खंडाळा) येथे हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबा दर्गाह अनेक वर्षांपासून आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या दर्ग्याकडे पाहिले जाते. हजरत पीर सय्यद पठाणशाह बाबांच्या   ४१ व्या ऊरूसानिमित्त शुक्रवारी १८ जुलै रोजी  
सायंकाळी दर्गाह स्थळापासून नीरा गावातून  मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री ही मिरवणूक पुन्हा दर्गाह येथे  आल्यानंतर बाबांच्या समाधीला धार्मिक विधिवत संदल लावण्यात आला.
                शनिवारी १९ जुलैला दुस-या दिवशी 
ऊर्सानिमित्त बाबांच्या दर्शनासाठी नीरा, पाडेगाव, निंबुत,लोणंद, बारामती परिसरासह पुण्याहून दर्शना साठी भाविक आले होते. रात्री मिलादख्वाणीचा कार्यक्रम पार  पडला.
      तिसऱ्या दिवशी २० जुलैला कुराण पठण करण्यात आले. त्यानंतर जियारतचा धार्मिक विधी करण्यात आल्यानंतर  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
       यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, पुणे जि.प.चे माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण, जि.प.चे माजी सदस्य विराज काकडे, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे,  समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण,  नीरा ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, पाडेगांवचे माजी सरपंच विजय धायगुडे, सोमेश्वरचे माजी संचालक महेश काकडे, बाळासाहेब ननवरे, नितीन कुलकर्णी , उपस्थिती मध्ये अँड.पृथ्वीराज चव्हाण,  भगवानराव माने, गजानन माने,  यांच्यासह हजारो भाविकांनी बाबांचे दर्शन घेतले.
      दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष मुस्तफा आतार,  उपाध्यक्ष  रशीदभाई सय्यद, सचिव फिरोज सय्यद , विश्वस्त मोहंम्मदगौस आतार यांच्यासह दर्गाह‌ खिदमतगार कमिटीचे मन्सुर सय्यद, आयुब मुलाणी,  नसरूद्दीन शेख यांच्यासह अनेक तरूण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. 
----------------------------------------------------------------
To Top