सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
नीरा (ता- पुरंदर)येथील ज्येष्ठ विधिज्ञ आदेश गिरमे व पुणे येथील ज्येष्ठ विधीज्ञ अशोक गिरमे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हणमंतराव गिरमे वय ९१ यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.
त्यांच्या मागे तीन विवाहित मुली व दोन विवाहित मुले ,नातवंडे असा परिवार आहे. त्या नीरा पंचक्रोशी मध्ये नानी या नावाने प्रसिद्ध होत्या. धार्मिक कार्यक्रमात त्या नियमित अग्रेसर असत. त्यांच्यावर नीरा येथे आज सायंकाळी अंत्यसंस्कार करणेत आले.पुण्याच्या माजी उपमहापौर वैशाली बनकर तसेच नीरा हडपसर, पुणे, सासवड बारामती पंचक्रोशीतील राजकीय,सामाजिक व वकिली क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नीरा येथील बाजारपेठ देखील बंद ठेवण्यात आली होती.