सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील मार्गासनी येथील शेतकरी सुरेश मारुती शेंडकर यांनी एक वर्षाच्या भेखराच्या पिलांचे प्राण वाचवले आहे.
सुरेश शेंडकर हे आपली दुधाळ जनावरे घेऊन रानामध्ये चरण्यासाठी गेले असता या ठिकाणी एक भेखराचे पिल्लू दिसले गावठी चार पाच कुत्रे त्याचा पाठलाग करीत होती. आपले प्राण वाचविण्यासाठी पिल्लू सैरावैरा पळत सुटले. परतू कुत्री त्याचा पाठलाग करीत होते. शेतकरी सुरेश शेंडकर यांनी प्रसंगावधान दाखवून कुत्र्यांना पळवून लावले व कुत्र्यापासून भेखराच्या पिल्लाचे प्राण वाचविले. त्यानंतर वनविभागात संपर्क केला व भेखराच्या पिल्लास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सोपवले. एका मुक्या प्राण्यांचा जीव वाचवला बद्दल शेतकरी सुरेश शेंडकर यांचे वनविभागाचे अधिकारी व ग्रामस्थानी आभार मानले.