सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरूर : प्रतिनिधी
कारेगाव ता. शिरूर येथे पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कारेगाव येथील बाभुळसर शिवारातील शेततळ्यात चार मुल पोहायला गेली होती. या चौघांपैकी अनमोल प्रविण पवार वय १३ वर्ष तसेच कृष्णा उमाजी राखे वय ८ वर्ष यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला
या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना दि. २८ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. चौघांपैकी आदेश प्रविण पवार वय १४ वर्ष व स्वराज गौतम शिरसाठ वय १३ वर्ष यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. चारही मुलं शेततळ्यात पोहोण्यासाठी उतरली होती. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली.