सुपे परगणा l आपापल्या संसारात रमलेले मित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून एकोणीस वर्षांनंतर पुन्हा वर्गात रमले

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे ( ता. बारामती ) येथील श्री शहाजी हायस्कुल मधील माजी विद्यार्थांचा तब्बल १९ वर्षानी वर्ग भरला. यावेळी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवनींना उजाळा मिळाला. 
          या शाळेतील २००६ मधील विद्यार्थी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सुमारे १९ वर्षांनी एकत्र आले. यावेळी माजी प्राचार्य एल. टी. कदम, माजी प्राचार्य एच. एस. खाडे, मधुकर ढोबळे, एस.पी. नेवसे, एस. व्ही. देवकुळे,पी. टी. लोणकर, डी. जी. लडकत, एन .पी काकडे, डी. बी. सपकाळ, एस. आर. ढमाळ आदी शिक्षक उपस्थित होते. त्यांना हार व फेटे आणि सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. 
         यावेळी परिचय करुन देताना वकील, पोलीस, इंजिनिअर, शिक्षक, पत्रकार, राजकीय क्षेत्रात नगरसेवक, उपसरपंच, तसेच उत्कृष्ट शेतकरी असल्याचे यावेळी समजले. बदलत्या काळानुसार प्रत्येकजण व्यस्त झाला आहे. मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातुन प्रत्येकाने एकमेकाशी संपर्क साधत हा स्नेहमेळावा घडवुन आणला. यातील मागिल बाकावर बसणारे बहुतांश विद्यार्थी वकिल, पोलिस आणि इंजिनिअर झाले आहेत. 
      कार्यक्रमाचे प्रस्ताविक अजय देवमळकर यांनी केले. सुत्रसंचालन शांताराम चांदगुडे यांनी केले. तर आभार सचिन पवार यांनी मानले. 
        ................................
To Top