सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
मालवाहू डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडिलांसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बारामतीत रविवारी घडली होती. या घटनेत आचार्य कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला होता.
दरम्यान या घटनेचा धक्का सहन न झाल्याने राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही आज पहाटे निधन झाले. ते निवृत्त शिक्षक होते. रविवारी झालेल्या अपघातात ओंकार राजेंद्र आचार्य यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुली मधुरा व सई यांना आपला जीव गमावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या घटनेचा धक्का सह न झाल्याने आणि अपघातात आपला मुलगा आणि दोन्ही नाती गमावल्याने बसलेल्या धक्क्यामुळे राजेंद्र आचार्य यांचेही निधन झाले यामुळे आचार्य कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.. काल ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुलींचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आज ओंकार यांच्या वाडीलांचे निधन झालं आहे. आचार्य यांच्या घरातील ४ जण २४ तासाच्या आत मृत्यूमुखी पडले.