सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
आळंदी : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील नितीन मोरेश्वर कुलकर्णी यांची सहकार भारती पुणे जिल्हा संघटन प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
आळंदी-पुणे येथे सहकार भारती पुणे या संस्थेला ४७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित सहकार मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची घोषणा विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष व भारती सहकारी बँकेचे कार्यकारी मंडळ अध्यक्ष भाऊसाहेब कड, सहकार भारतीचे केंद्रीय पदाधिकारी विनय खटावकर, सहकार भारती पुणे विभाग प्रसिद्धी प्रमुख देवदत्त कसबेकर, रा.स्व. संघ प्रांत बौद्धिक मंडळाचे सदस्य मकरंद ढवळे, पुणे महानगर अध्यक्ष दिनेश गांधी व पिंपरी चिंचवड महानगर अध्यक्ष दशरथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हा कार्यकारिणी
विनायक तांबे - पुणे जिल्हा अध्यक्ष
उत्तम फाळके - पुणे जिल्हा महामंत्री
नितीन कुलकर्णी पुणे जिल्हा संघटन प्रमुख
बाळासाहेब गाढवे पुणे जिल्हा सह संघटन प्रमुख
प्रतिभाताई कांचन पुणे जिल्हा महिला प्रमुख
भाऊसाहेब आवळे पुणे जिल्हा साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख.
अनंत निकम - साखर कारखाना सह-प्रकोष्ठ प्रमुख
मच्छिन्द्र ताकवणे, पुणे जिल्हा दुग्ध प्रकोष्ठ प्रमुख
उदय आचार्य, पुणे जिल्हा दुग्ध प्रकोष्ठ सहप्रमुख
विनोद अष्टुल पुणे जिल्हा पतसंस्था प्रकोष्ठ सहप्रमुख
संजय वरुडे - पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य.
तालुका प्रमुख घोषणा
दौंड तालुका इंद्रजित चांदगुडे अध्यक्ष, श्री. आकाश जाधव - तालुका संघटन सचिव
मावळ तालुका सुरेश दाभाडे अध्यक्ष.
पुरंदर तालुका रवी देशपांडे अध्यक्ष. श्री. गजानन मांडके संघटन
सचिव, सायली मेहता - महिला प्रमुख
लभोर तालुका - सदानंद धुमाळ अध्यक्ष.
आंबेगाव तालुका - शांताराम शेटे अध्यक्ष.
बारामती तालुका -विकास केंजळे अध्यक्ष, श्री. मदन काकडे- संघटन सचिव
जुन्नर तालुका -जयवंत घोडके अध्यक्ष.
इंदापूर तालुका - आदित्य घोलप अध्यक्ष. मा. श्री. वैभव मोरे संघटन सचिव
शिरूर तालुका- मा.श्री. सुभाष रामचंद्र साठे अध्यक्ष, स सुनिता गावडे महिला प्रमुख