Purandar News l पुरंदर तालुका भाजपा उपाध्यक्षपदी दिलीप कटके

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी 
पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्षपदी भिवरी (ता. पुरंदर )येथील उद्योजक दिलीप सदाशिव कटके यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष शेखर वढणे व पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष संदिप कटके यांनी दिलीप कटके यांना दिले.
             पुरंदर हवेली तालुका भाजपा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालींदर कामठे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष साकेत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कार्यरत राहून भाजपाची ध्येय, धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवून पुरंदरमध्ये शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे आणणार आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीच्या दृष्टीने भाजपा पक्षाचे तळागाळापर्यंत  मजबूत संघटन बांधून सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे निवडीनंतर दिलीप कटके यांनी सांगितले.
   दिलीप कटके हे उद्योजक असून त्यांनी आतापर्यंत भिवरी गावचे सरपंच,भैरवनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष, श्रीनाथ गोसावी बुवा मंडळाचे अध्यक्ष , पुरंदर तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पद भूषवले आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

To Top