सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस असणाऱ्या वाघापूर गावच्या सरपंचपदी दिपाली रमेश कुंजीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सरपंच रेवती कुंजीर यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त झाल्याने ही निवडणूक घेण्यात आली.सरपंच पदासाठी दिपाली कुंजीर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दुर्गादास शेळकंदे यांनी त्यांची सरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून , तलाठी स्वाती पाटील, ग्रामसेविका उज्वला हिंगणे यांनी काम पाहिले.
यावेळी उपसरपंच ताई कुंजीर,सौरभ कुंजीर,शंकर कड,सारिका कुंजीर,उज्वला इंदलकर,राजेंद्र कांबळे हे सदस्य उपस्थित होते.
यावेळी पुरंदर पंचायत समिती माजी सभापती अॅड. गौरीताई कुंजीर, पुरंदर तालुका युवासेनाप्रमुख अॅड. नितीन कुंजीर , शिवसेना नेते मनोज कुंजीर , माजी उपसरपंच बाळासाहेब कुंजीर ,विकास इंदलकर, बापूसाहेब कुंजीर, अशोक कुंजीर , पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटना कार्याध्यक्ष विजय कुंजीर, शहाजी कुंजीर, चांगदेव कुंजीर , रमेश कुंजीर आदीसह वाघापूरकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी नवनिर्वाचित सरपंच दिपाली कुंजीर यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गावकारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहून शासनाच्या निधीमार्फत विविध विकास कामे राबवून वाघापूरचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच दिपाली कुंजीर यांनी सांगितले.