सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांची युरिया साठी पिळवणूक सुरू असून इतर कोणत्याही प्रकारच्या खतासोबत युरिया दिले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राजगड तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी 200 टन युरिया बफर साठी व नेहमीसाठी लागणारा युरिया योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याबाबत खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये पंचायत समिती वेल्हे व कृषी विभाग यांनी ग्वाही दिली होती पण वास्तवात यांच्या करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. पण वास्तविक पाहता 30 जून पर्यंत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून फक्त 70 टन युरिया हा बफर साठी उपलब्ध करून देण्यात आला व या युरियासाठी सुद्धा भाडे द्यावे लागले अशा प्रकारची पिळवणूक ही महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आली व त्याच बरोबर चालू हंगामासाठी सुद्धा युरिया बाजारामध्ये उपलब्ध न करून दिल्यामुळे राजगड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीला सामोरे जावे लागत आहे
याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांनी जिल्हाधिकारी पुणे, पालकमंत्री अजित पवार व चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी केली आहे
--------------
मोठ्या डीलर यांच्या माध्यमातून युरिया खताची मागणी विक्रेत्यांनी केली असता त्यांना प्रत्येक युरियाच्या गोणी बरोबर इतर खत घेणे अनिवार्य आहे असं सांगण्यात येत असल्यामुळे त्या दोन्ही खताची खरेदी ही करावी लागत आहे त्याचबरोबर दोन्ही खताची खरेदी केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा इच्छा नसताना सुद्धा या प्रकारची युरिया घ्यायचा असेल तर दुसरं खत घ्यावंच लागेल अशा पद्धतीच्या अट कारण नसताना टाकावी लागत आहे या साठी आम्हाला फक्त युरिया कृषी विभागाने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.
आनंद देशमाने खत विक्रेता : वेल्हे
----------------------
तातडीने राजगड तालुक्यामध्ये कृषी विभाग वेल्हे व पंचायत समिती वेल्हे यांच्या माध्यमातून उर्वरित राहिलेला युरिया बफर साठी उपलब्ध करून देऊन बाजारामध्ये युरियाची जी पिळवणूक होत आहे ती थांबवण्याच्या दृष्टीने युरिया उपलब्ध करून देण्याची खूप गरज आहे त्याच बरोबर डि ऐ पी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.