सोमेश्वर रिपोर्टर टिम------
भोर : संतोष म्हस्के
सध्याच्या काळात सहकार क्षेत्रात पतसंस्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षक,शिक्षिका सामाजिक भान राखून विविध प्रकारच्या सुलभ उलाढाली करीत कौटुंबिक भवितव्य घडविण्याचे काम करीत असतात.भोर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची उलाढाल भली मोठी असून जिल्ह्यात नावाजलेली पतसंस्था आहे. म्हणूनच पतसंस्थेचे कार्य आदर्शवत आहे असे मत भोर राजगड-मुळशी-आमदार शंकर मांडेकर यांनी व्यक्त केले.
भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवार दि.२९ रोजी आमदार मांडेकर बोलत होते. वार्षिक सभेवेळी गुणवंत विद्यार्थी, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षक,शिक्षकांचा सन्मान केला गेला.याuवेळी माजी जि.प.सदस्य चंद्रकांत बाठे,माजी उपसभापती विक्रम खुटवड, जिल्हा कार्याध्यक्ष पोपट निगडे,सभापती दत्तात्रय पांगारे,उपसभापती रामदास साळवे,माजी सभापती संजय वाल्हेकर,संचालक राजेंद्र कंक,पंडित गोळे,बापू जेधे,सुदाम ओंबळे,शिक्षक संघटना अध्यक्ष सुनील लेकावळे,रमेश चव्हाण,भीमराव शिंदे आदींसह संस्थेचे संचालक,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मांडेकर पुढे म्हणाले भोर तालुका दुर्गम डोंगरी असला तरी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळां आहेत.शाळांमधील शिक्षक,शिक्षिका बाल वयात विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करून विद्यार्थी घडविण्याचे काम करीत असतात.विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच शिक्षक सामाजिक बांधिलकी जपित पतसंस्थेचा भला मोठा डोलारा उत्कृष्टपणे सांभाळण्याचे काम करीत आले आहेत.या पार्श्वभूमीवर भविष्यात शिक्षक पतसंस्था गगनभरारी घेतल्याशिवाय राहणार नाही.