सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुतवळवाडी (ता. बारामती ) येथील दत्तात्रय कुतवळ यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली.
बारामती खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दत्तात्रय कुतवळ यांची मुलगी अपेक्षा ( वय २० ) हिचे कर्करोगाने नुकतेच निधन झाले. तिचे बी टेकचे दुसऱ्या वर्षाचे शिक्षण पुणे येथील व्हीआयआयटी मध्ये सुरु होते. तिचे कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान पवार यांनी शनिवारी ( दि. २८ ) कुतवळ यांच्या घरी जावुन कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. तसेच कुटुंबाशी चर्चा करुन मुलीच्या आजारा बाबतची माहिती जाणुन घेतली.
..................................