Baramati Breaking l जातीवाचक शिवीगाळ करत फायटर व चाकूने मारहाण : सात जणांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर ता. बारामती येथे जातीवाचक शिवीगाळ करत फायटर व चाकूने हल्ला केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीसात अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        याबाबत संजय श्रावण साऴवे वय ५३ वर्ष रा वडगाव निंबाऴकर ता बारामती जि पुणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी सुरज दरेकर ,शुभम दरेकर ,सौरभ दरेकर ,भुषण दरेकर,ऋषिकेश दरेकर ,ओंकार दरेकर ,राहुल उर्फ बापु दरेकर सर्व रा वडगाव निंबाऴकर दरेकर मऴा ता बारामती जि पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २९ रोजी रात्री १० वाजता वडगाव निंबाऴकर येथिल इरिकेशन बंगला येथिल अजित भोसले यांचे घराजवऴ घडली. 
       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज दरेकर याने तू आमचा वाद मिटवणार का असे म्हणुन जातीवाचक शिवीगाऴ करुन तु कीतीही घेऊन ये असे म्हणुन हातातील फायटर फिर्यादीचे उजवे डोऴ्याचे वर मारला त्यावेऴी त्यांचे उजवे डोऴ्याचे वर जखम होवुन रक्त येऊन ते खाली पडले. त्यावेऴी फिर्यादी संजय साळवे सोबत असणारे सचिन साऴवे हे त्यांना उचलण्याकरीता येत असताना परत फिर्यादीला उर्वरित आरोपी यांनी यांनी हाताने लाथाबुक्याने छातीवर तोंडावर पाठीत मारहाण केली त्यावेऴी आरोपी राहुल दरेकर हा हातात चाकु घेऊन फिर्यादीचे अंगावर धावुन आला त्यावेऴी सचिन साळवे याने त्यास बाजुला केले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करीत आहेत.
To Top