Baramati Breaking l धावत्या बसमध्ये कोयत्याने हल्ला..! एक जण गंभीर जखमी : बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
काटेवाडी : प्रतिनिधी
बारामतीहून इंदापूरकडे निघालेल्या एसटी बस मध्ये काटेवाडी ऱ्या उड्डाण पूला वरती एसटी बस मध्ये अज्ञात व्यक्तिने पवन गायकवाड या युवकावर कोयत्याने वार केल्याने गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहे.  
            ही घटना शुक्रवार दि. १ रोजी सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान घडली. एसटी मध्येही झटापट चाल असताना एकच गोंधळ उडाला यावेळी एसटी वाहक तिकीट काढण्याचे काम करत होते या गोंधळामुळे काटेवाडी च्या उड्डाण पूलावर एसटी बस थाबवण्यात आली कोयत्याने वार झाल्याने पवन गायकवाड रक्तबंबाळ झाले होते त्याही अवस्थेत गाडी थाबलेने गायकवाड जिवाच्या आंकातने एस टी तून पळत सुटले एसटी बस थाबल्याने पुलावर एकच गोंधळ उडाला त्या गोंधळात कोयता धारक अज्ञात युवक त्याच्या विरुद्ध दिशेने पळून गेला गावातील युवक व काही प्रवाशानी सिनेस्टॉ इल पाठलाग सुरू केला मात्र त्याचवेळी बारामतीकडे चाललेले वाचलंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस व बारामती हून आलेले पोलीस यांनी पळून चाललेल्याअज्ञात व्यक्तीस पकडले या हल्ल्याची खबर बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना समजतात तेही तातडीने  घटनास्थळाकडे निघाले त्यांच्याबरोबर पोलीस निरीक्षक वैशाली पाटील व पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीस ताब्यात घेतले व जखमींना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र काटेवाडी येथे उपचार करून गंभीर जखमी झाल्याने  बारामतीच्या शासकीय रुग्णालयात  पाठवले तर अज्ञात व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे. 
To Top