सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर - हेमंत गडकरी
महाराष्ट्रात बंदी असलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा व तो पुरवठा करणारा वडगाव निंबाळकर पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
ऋषिकेश गजानन पोरे ( रा. निरा ता. पुरंदर) व विशाल गाढवे ( रा. लोणंद ता. खंडाळा) अशी गुटख्याचा अवैध व्यापार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून गुटख्यासह ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील आरोपी ऋषिकेश गाढवे आपल्या जवळीक स्कूटी वरून निरा बाजूकडून बारामती बाजूकडे गुटखा घेवून निघाला निंबुत येथील बस स्थानका समोर त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याने विशाल गाढवे हा आपला साथीदार असल्याचे सांगितले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपक वारुळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक वारुळे करत आहेत.