Javali News l वसंतराव मानकुमरे म्हणजे नौटंकी : निषेध मोर्चावरून संदिप पवारांचा घणाघात

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील सुपुत्राला महाराष्ट्रात मिळालेल्या  पदाच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले असताना जावलीतील जनतेला त्याचा आनंदच आहे परंतु ज्या माणसाची जावली तालुक्यात ओळख नाही, ज्याच्यावर एसआयटी चौकशी सुरू आहे अशा दत्तात्रय पवार भालेघरे बद्दल निषेद मोर्चे काढुन काय साध्य होणार असा प्रश्न उपस्थित करून वसंतराव मानकुमरे म्हणजे नौटंकी असल्याचा घणाघात शिवसेना (शिंदेगट ) जिल्हा उपाध्यक्ष संदिप पवार यांनी केला.
               मेढा येथिल विश्राम गृहात पत्रकार परिषदेत बोलताना संदिप पवार म्हणाले जावलीतील  सामान्य माणूस आजही वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षणासाठी झगडतो आहे. स्वतःच्या गावातील पानस हातेगर रस्ता गेली दहा वर्षे प्रलंबीत , आबेघर हातगेघर कावडी रस्ता आज अखेर अपूर्ण, कॅनॉलचे पाणी शेतात अजून पोहचले नाही, गत ४० वर्षे बावधन रस्ता रखलेला आहे असे अनेक प्रश्न प्रलंबीत बाजूल ठेवून मुंबईच्या वादाला जावलीत गुदमरवण्याचा  संधीसाधूचा प्रयत्न मानकुमरे करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
           ते पुढे म्हणाले ज्या व्यक्तीवर एसआयटी चौकशी सुरू आहे त्याच्या पाठीशी उभे राहणे हे कोणत्या नैतिकतेत बसतं ? असा प्रश्न उपस्थित करून दत्तात्रय पवार भालेघरे यांचे कार्यक्षेत्र मुंबई ठाणे असताना जावलीत मोर्चा कशाला असेही संदिप पवार यांनी सांगितले. तसेच ही बाब संसदीय चौकशी अंतर्गत असताना त्याचा आवाज मुंबईच्या विधान भवनात निघाला पाहीजे पण यांना तहसिल कार्यालय आणि विधान भवन याचा फरकच कळेना झालाय म्हणजे याला मोर्चा म्हणायचा की मुर्खपणा असा घणघात वसंतराव मानकुमरे यांच्यावर संदिप पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
           दत्तात्रय पवार भालेघरे यांचे वकील पत्र , सुपारी घेवून काम करणाऱ्या मानकुमरेंनी 30 वर्षात किती जनतेच्या प्रश्नांसाठी अंदोलने केली. पाचहजार लोकांना नोकरी देणाऱ्या पवारांची पाचशे लोकांची यादी जाहीर करावी असे आवाहन संदिप पवार यांनी करून मोर्चासाठी दोन वेळेचे जेवन, स्वेटर, जर्किंग , भेटवस्तुचे वाटप आणि प्रत्येक गाडीला तीन हजाराच भाडं म्हणजे निषेदमोर्चा नव्हे तर सवलतीचे पॅकेज असल्याचे संदिप पवारांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
           यावेळी संदिप पवार म्हणाले जावलीतील एका सुपुत्राची महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यावर जावलीकर म्हणून सुसंस्कृत राजकारणी म्हणून अशा व्यक्तीचे सत्कार करणे किंवा अभिनंदन करणे हा संस्काराचा भाग आहे असे सांगुन मुंबई कार्यक्षेत्र असणाऱ्या नेत्यासाठी जावलीत मोर्चा काढणे म्हणजे तालुक्याचा अपमान असल्याचे संदिप पवार यांनी सांगितले.
         जावलीच्या स्वाभमानाचा सौदा करणाऱ्यांना जनता ओळखु लागली आहे असे सांगुन हा मोर्चा नसुन वसंतराव मानकुमरेंच्या राजकीय आयुष्याची कृत्रिम श्वासयंत्रणा आहे अशी टीका पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. आज तुमचं मौन म्हणजे उद्याच पतन ठरेल म्हणून उठा, विचार करा आणि ढोंगी नेतृत्वाचा पर्दाफाश करा  असे आवाहन जावलीतील जनतेला यावेळी संदिप पवार यांनी केले.
         पत्रकार परिषदेला शिवसेना तालुका उपप्रमुख राजेश माने, शहर प्रमुख संजय सुर्वे, शिव उद्योग सेना तालुका अध्यक्ष सतिश पवार, सरंपच श्रीरंग गलगले, सुर्यकांत जाधव, दत्ता पोफळे आदी उपस्थित होते.
To Top