सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
कोणतीही विकासाची कामे करताना गावकऱ्यांची एकजूट महत्वाची असते, त्यावेळी अधिकारी सुद्धा सहकार्य करतो असे प्रतिपादन बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली.
गावकऱ्यांची गावच्या विकासासाठी एकजूट महत्वाची असून तरच गावचा विकास होऊ शकतो, यावेळी अधिकारी सुद्धा सहकार्य करतो अशी प्रतिपादान बारामतीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली.
सुपे ( ता. बारामती ) येथे कचरामुक्त अभियानाचा सुरुवात करण्यात आली. तसेच ग्रामपांचायत पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार आणि सुप्याच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी किशोर माने बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुपे ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे होते.
सुपे ग्रुप ग्रामपंचायत १९९३ मध्ये विभक्त होऊन ३२ वर्षे पूर्ण झाली. या कार्यकाळात ८ सरपंच, १० उपसरपंच व ४८ सदस्य होऊन गेले. त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी सुपे गाव कचरामुक्त करण्याबाबत जनजागृती करून १५ ऑगस्टनंतर प्रत्येक कुटुंबाला एक कचरापेटी देऊन गावात घंटागाडी फिरणार असल्याची माहिती यावेळी सरपंच तुषार हिरवे यांनी दिली.
सुपे ग्रामपंचायत कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार असून त्यासाठी घंटागाडी राष्ट्रवादी पक्षाच्यावातीने देण्यात यावी अशी मागणी तालुका दूध संघाचे संचालक सुशांत जगताप यांनी केली. त्यास प्रतिसाद देत तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, ज्ञानेश्वर कौले, बी. के. हिरवे, शौकत कोतवाल, सुशांत जगताप, मल्हारी खैरे, रुक्मिणी चव्हाण, दामोदर दरेकर, सोमनाथ कदम, साधु सकट, रेखा चांदगुडे, राजेंद्र जोशी आदींनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी निता बारवकर, शंकर शेंडगे, शफीक बागवान, विलास वाघचौरे, नयना जगताप, विशाल चांदगुडे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक सरपंच तुषार हिरवे यांनी केले. महेश चांदगुडे यांनी सूत्रसंचालन केले.
.......................................