सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
निरा-बारामती रस्त्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर धडकेत एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
शुभम गोरख खिलारे वय २१ रा. माळेगाव खुर्द ता. बारामती असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना दि. १९ रोजी निरा-बारामती रस्त्यावर वडगाव निंबाळकर येथील ढोलेवस्ती येथे सकाळी ८ वाजता घडली. याबाबत सागर सुभाष लांडगे रा. पारवडी ता. बारामती याने वडगाव निंबाळकर पोलिसांत घटनेची माहिती दिली. सविस्तर हकीकत अशी शुभम खिलारे बारामतीच्या दिशेने निरा बाजूला हा आपली दुचाकी स्प्लेडर एमएच बीसी ८९८१ वरून निरा बारामती रस्त्यावरुन जात असताना समोरील दुचाकी प्लसर एमएच एव्ही १६४८ ही निरा दिशेने बारामती कडे निघाली होती. वडगाव निंबाळकर येथे ढोलेवस्ती जवळ दोन्ही दुचाक्या एकमेकांना धडकल्या. यामध्ये शुभमच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.