सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
निरा खोऱ्यातील तीन धरणे शंभर टक्के भरली असून वाटचाल सुरू असून काल भाटघर, निरा देवघर व गुंजवणी या तीनही धरणातून वीर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आज दि. १९ रोजी सायंकाळी ४ वाजता वीर धरणातून निरा नदीत ३३ हजार ५०० क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग वाढला आहे.तर सायंकाळी याच विसर्गात वाढ करून वीर धरणातून निरा नदीपत्रात ४२ हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
सद्या निरा देवघर ९७.८५ टक्के, भाटघर १०० टक्के वीर ७४ टक्के तर गुंजवणी ८१ टक्के तर वीर ९५ टक्के भरले आहे.