Baramati Crime l परप्रांतीय कामगार कामाला ठेवताय..तर सावधान ! पाहुणेवाडीत हॉटेल कामगारांनीच केलं हॉटेल साफ : माळेगाव पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानकावरून अवळल्या दोघांच्या मुसक्या

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील हॉटेल अमित येथे कामाला असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांनी हात साफ करत हॉटेलमधील साहित्यावर तब्बल ८९ हजारांच्या साहित्यावर डल्ला मारला. माळेगाव पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात  आरोपींना गजाआड केलं.           
         याबाबत हॉटेल अमितचे मालक अमित उदयसिंह जगताप वय 39 वर्ष  रा. नागेश्वरनगर, माळेगांव बु ता.बारामती जि.पुणे यांनी माळेगाव पोलीसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी, 
अमित जगताप यांनी दि. १५ रोजी रात्री ११ च्या सुमारास हॉटेल अमित बंद करून घरी गेले. ते  दि. १६ रोजी पहाटे पाच च्या दरम्यान हॉटेल कामगार म्हणून काम करणारे सुरज रामनरेश वर्मा व विकास बाधम (पुर्ण नाव माहित नाही) दोघे रा.डंडनियापुरा ता.फातियाबाद जि.आग्रा राज्य उत्तर प्रदेश यांनी संगनमताने ऑक्सिस स्कुटी गाडी, कॅम्प्युटर त्याचा सीपीयु प्रिंटर, वरपुल कंपनीचा ओवन, मिक्सर, स्टिलचा सेन्डवीज पिलर, वायफाय मशीन, असा एकूण रक्कम ८९ हजारांच्या वस्तू लंपास केल्या. गुन्हा दाखल झालेनंतर माळेगांव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि.सचिन लोखंडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शोध पथकास आरोपी तसेच चोरीस गेले मुद्देमालाचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाने आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील असल्याने ते मूळगावी पळून जाण्याची शक्यता जास्त असल्याने माळेगांव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषण आणि सदर गुन्ह्याचे घटनास्थळ ठिकाणचे सी.सी.टी.व्ही चे आधारे यातील आरोपी क्रमांक 1 व 2 हे रेल्वेने दौंड येथून मनमाड मार्ग उत्तर प्रदेश असे जात असताना मुद्देमालासह मनमाड रेल्वे स्टेशन येथे ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचे अटक केलेली आहे 
       सदरची कामगिरी संदीपसिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण) गणेश बिरादार सो, (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग), डॉ.सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी स.पो.नि.सचिन लोखंडे तसेच पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मोरे,अमोल राऊत,अमोल कोकरे यांनी केलेली आहे.
To Top