सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे पर्यटन परिवहन विभागांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या भिवरी (ता. पुरंदर )येथील रहिवाशी व पुरंदर कामगार विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बाळासाहेब गुरव यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत कामगार पुरस्कार पी एम पी एम एल चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन करण्यात आला.