सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
फलटण येथील युवकाचे बारामती तालुक्यातील एका युवतीचे २०१९ पासून असलेले शरीरसंबांधाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचारप्रकरणी फलटण येथील २४ वर्षीय तरुणावर वडगाव निंबाळकर पोलिसात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव आदेश निंबाळकर रा. फलटण जि. सातारा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2019 ते मे 2025 दरम्यान फलटण जि.सातारा येथील आरोपीच्या घरा जवळच असलेल्या जुन्या पडक्या खोलीत, फलटण येथील लॉज तसेच करंजेपुल ता.बारामती जि.पुणे येथे आरोपी याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. पीडिता ही नोव्हेंबर 2019 मध्ये मुधोजी हायस्कुल फलटण ता.फलटण जि.सातारा येथे इयत्ता 10 वी षिक्षण घेत असताना यातील आरोपी गौरव आदेश निंबाळकर यांची ओळख झाली. त्यानंतर तो पीडितेशी बोलत होता सन 2020 मध्ये आरोपी याने पीडितेला वाईट भावनेने शरीसुखाची मागणी केली असता तिने त्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करु लागला त्रास देवु लागला मी तुझे घरच्यांना तुझेबाबत काहीपण सांगेन तुझी बदनामी करेन असे धमकी देवु लागल्याने पीडिता आरोपीशी फोनवर बोलण्याचे बंद केलेने आरोपीने एके दिवशी पीडिता ही घरी एकटी असताना आरोपीने राहते घरात येवुन पीडितेस ‘तु माझेशी फोनवर बोल नाही तर मी तुझ्याबाबत तुझे घरच्यांना तुझे व माझे लफडे आहे असे सांगतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने फिर्यादीस फोन करुन बोलावुन घेवुन तिच्या उजवे हाताला धरुन त्याचे ताब्यातील काळे रंगाची mt/50 मोटार सायकलवर बसवुन फलटण येथील लॉज येथे नेत पिडीतीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीसंबध केले. त्यावेळी त्याने त्याचे मोबाईलमध्ये फिर्यादीचे उघडे फोटो तसेच फिर्यादी व आरोपी या दोघांचे उघडे फोटो, व्हिडीओ काढुन फिर्यादीस तु जर सदर प्रकार घरी सांगीतला तर मी तुझे उघडे फोटो, व्हिडीओ सगळीकडे व्हायरल करील अशी धमकी देऊन पीडितेस ब्लॅकमेल करुन जबरदस्तीने लॉज येथे नेवुन फेब्रुवारी 2024 पर्यंत वेळोवेळी पीडितेशी तीच्या इच्छेविरुद्ध शरीसंबध केले आहेत. त्यानंतर दि. 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास आरोपीने पीडिता राहत असलेले करंजेपुल येथे येवुन तु माझे सोबत लॉजवर चल नाहीतर मी माझे मोबाईलमध्ये असलेले तुझे उघडे फोटो, व्हिडीओ हे सोशल मिडीयावर व्हायरल करेन अशी धमकी देवुन फिर्यादीस हाताने मारहाण करुन तुला सुखाने जगु देणार नाही. असे म्हणुन जिवे मारणेची धमकी दिली आहे .