Indapur Breaking l भादलवाडी येथे पाण्याच्या डोहात बुडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
इंदापूर : संतोष माने
भादलवाडी ता. इंदापूर येथे पाण्याच्या डोहात बुडून एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
         महंमद नशीब अफजल (वय वर्ष २५ ) सध्या रा.भादलवाडी ,ता. इंदापूर, जि_पुणे असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. ही घटना काल दि. ७ रोजी घडली. कृष्णा भीमा स्थिरीकरण नदी जोड प्रकल्प याचे काम इंदापूर तालुक्यातील भादलवाडी सुरू आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराचा पाण्याच्या डोहामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. संबंधित कामगार हा परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली आहे. नदी जोड प्रकल्पाचे काम पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या खालून सध्या सुरू आहे. त्या ठिकाणी अनेक कामगार काम करतात. पाण्याच्या डोहामध्ये बुडालेला कामगार नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी डोहाच्या ठिकाणी गेला होता. परंतु संबंधित कामगार परत माघारी न आल्याने इतर कामगारांनी व्यवस्थापन यांना माहिती दिली. त्यानंतर ज्या डोहाच्या ठिकाणी कामगार आंघोळीच गेला होता. त्या ठिकाणी पाणबुडी च्या साह्याने शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. काही मिनिटातच संबंधित कामगाराचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी भिगवण पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर शिवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेद्वारे भिगवण येथे नेण्यात आला. 
To Top