सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथे भुरट्या चोऱ्या वाढल्या असून मागील आठवड्याभरात घराची कौल उचकटून एका घरातील सिलेंडर टाकी चोरट्यांनी लंपास केली असून एका किराणा दुकानातून १२ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.
ताताब्या शंकर जगताप यांचे निंबुत गावात भैरवनाथ मंदिर शेजारी घर आहे. जगताप यांचे कुटुंब कामानिमित्त पुणे या ठिकाणी असते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दि. १४ रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान घराची कौले उचकटून घरात प्रवेश केला. घरात काहीच न सापडल्याने चोरट्यांनी गॅस सिलेंडरवर डल्ला मारला. असाच पाठीमागे त्यांचे घर फोडून चोरट्यांनी गॅस सिलेंडरवर डल्ला मारला होता. तसेच शेजारीच असलेले प्रवीण काकडे यांच्या दुकानातील १२ हजार रुपयांचा गल्ला चोरट्यांनी लंपास केला होता.