सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती-फलटण रस्त्यावर पाहुणेवाडी ता. बारामती येथे दुकानदारांना अवैद्यरीत्या गुटखा पुरवठा करणाऱ्या एकाला माळेगाव पोलिसांनी जेरबंद केले असून त्याचाकडून एका दुचाकीसह १३ हजार ५०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत माळेगाव पोलिसांनी महेश दत्तात्रय मदने रा. मळद ता. बारामती जि. पुणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास पाहुणेवाडी येथे माळेगाव पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ रोजी सकाळी ९ वाजता पाहुणेवाडी ता. बारामती जि. पुणे गावाच्या हद्दीत जय मल्हार किराणा स्टोअर जवळ महेश दत्तात्रय मदने वय 30 वर्षे रा.मळद ता. बारामती जि. पुणे हा त्याच्या ताब्यातील स्कुटी मोटारसायकलवरून महाराष्ट राज्य शासणाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून १६ हजार ५४४ रुपये किंमतीचा गुटखा विक्री करीता घेवुन जात असताना मोटारसायकल सह मिळुन आला आहे. म्हणुन महेश दत्तात्रय मदने वय 30 वर्षे रा. मळद ता. बारामती जि. पुणे यांचेविरूध्द भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 123,223,274,275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (1),26 (2) (ii),26(2)(iv),27(3)(d), 30(2) (a) प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदरची कारवाई सपोनि नागनाथ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, बारामती विभाग आणि माळेगाव पोलिसांनी केली.