Bhor Breaking l मित्रांसोबत कुलू-मनाली येथे फिरण्यासाठी गेलेल्या सारोळ्यातील अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू : ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने घडली घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील सारोळा येथील तरुण अभियंत्याचा कुल्लू मनाली येथे पर्यटनाला गेला असता ऑक्सिजनची पातळी कमी होऊन श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवार दि .३ ऑगस्ट रोजी घडली.आकाश नानासाहेब धाडवे पाटील (वय २५ ) असे तरुणाचे नाव असून तरुणाच्या अचानक  मृत्यूमुळे सारोळा गावावर शोककळा पसरली आहे.
     अभियंता आकाश हा नुकताच 'महिंद्रा' या नामांकित कंपनीत नोकरीला लागला होता.काही दिवसांपूर्वीच तो आपल्या मित्रांसोबत हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली येथे पर्यटनासाठी गेला होता. परंतु तिथे उंच ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत असताना त्याची प्रकृती अचानक बिघडली. यावेळी मित्र आणि स्थानिकांच्या मदतीने त्यास उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.परंतु प्रयत्न करूनही त्याला वाचवन्यात यश आले नाही.या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

To Top