सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता. पुरंदर )येथील विष्णू निवृत्ती कटके (वय ७९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे तीन बंधू, भावजया ,पुतणे,पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
इंजिनियर शेखर कटके, हेमंत कटके, अतुल कटके यांचे ते वडील होत. तर चतुर्मुख भैरवनाथ पंचक्रोशी प्रासादिक दिंडी सोहळ्याचे सचिव ज्ञानेश्वर उर्फ माऊली घारे यांचे ते मामे सासरे होत.