सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण घडवण्यासाठी शिक्षक-शिक्षिका वर्षानुवर्ष सचोटीने प्रयत्न करीत असतात.त्यासाठी पालकांचे मोलाचे सहकार्य लाभते. विद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून प्रत्येक विद्यार्थी शाळेचा आत्मा आहे असे मत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय भोर चे नवनिर्वाचित प्राचार्य अजय काळभोर यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या पालक मेळाव्यात प्राचार्य काळभोर बुधवार दि.६ बोलत होते.शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष देऊन आदर्श विद्यार्थी घडवून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण दिले जाईल.तर विद्यार्थी शिस्तप्रिय कसा होईल याकडे लक्ष दिले जाईल असेही काळभोर म्हणाले.पालक मेळाव्यात १० वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत पालकांकडून शिक्षकांना काही सूचना करण्यात आल्या.त्या सूचना तात्काळ अमलात आणल्या जातील असे शिक्षकांकडून सांगण्यात आले.तर प्रा.ज्योती दीक्षित यांनी विद्यार्थ्यांनी पूर्ण दिवसाचे वेळापत्रक तयार करून योग्य पद्धतीने अभ्यास केला पाहिजे.अभ्यास करताना एकाग्रता राखून अभ्यास करावा तर मोबाईलचा वापर टाळावा.विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात असे सांगितले.यावेळी प्रा.अण्णासो बाबर,नवनाथ दाभाडे, ,कविता चव्हाण,शैलजा बांदल,पालक खंडू घोलप,संतोष म्हस्के,अनिल मैंद,दिपाली बुदगुडे आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.