Daund Breaking l पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू : वरवंड येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वरवंड : प्रतिनिधी
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन दुचाकीवरून हिंगणीगाडा येथे घरी जात असताना मध्येच काळाने घाला घातला. दुचाकी रस्त्यावर उभी असलेल्या वाहनाला जाऊन धडकली. भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुण शालेय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
           दुसऱ्या तरुणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि २) घडली. आदित्यच्या मृत्यूने कुटुंबाचा आधारच नियतीने हिरावून नेला आहे. आदित्य सतीश खराडे (वय २४) आणि अविनाश संभाजी खराडे (वय १९ दोघे रा. हिंगणीगाडा ता. दौंड जि.पुणे), असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आदित्य आणि अविनाश हे दोघे ही शनिवारी (दि.२) रात्री पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन दुचाकीवरून घरी जात होते. 
वरवंड गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात आदित्य खराडे याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अविनाश खराडे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, अविनाश याचाही मंगळवारी (दि.५) उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

To Top