सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
वीसगाव खोऱ्यातील वरोडी डायमुख,पळसोशी ता.भोर येथील ग्रामपंचायत गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच सदस्य यांच्या पुढाकाराने डिजिटल झाली असून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डिजिटल क्यूआर कोड नंबर प्लेटचे उद्घाटन करण्यात आले.
नवीन तंत्रज्ञानामुळे क्यूआर कोडची नंबर प्लेट प्रत्येक घराच्या दरवाजावर बसवली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घराची लांबी, रुंदी तसेच किती थकबाकी आहे ते दिसणार आहे. क्यूआर कोडमध्ये पाच सेवा उपलब्ध आहेत. क्यूआर कोड मुळे नागरिकांना कर भरण्याची ऑनलाइन पावती, ८-अ उतारा, विवाह दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, निराधार योजनेचा दाखला. हे डिजिटल सहीसकट मिळणार आहे. नागरिकांची वेळेची आणि पैशाची बचत होईल. तसेच, व्यवहारात पारदर्शकता येणार आहे. यावेळ सरपंच भारती दशरथ भिलारे, सुनिता ताराचंद म्हस्के, उपसरपंच सचिन म्हस्के,ओंकार भिलारे,बाळासाहेब पोळ,नितीन म्हस्के, आनंद म्हस्के, रघुनाथ भिलारे ,कालिदास भिलारे उपस्थित होते.