सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
सांगवी हीमा (भाटघर धरण) ता.भोर येथील वारकरी सांप्रदायात ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून ओळखले जाणारे तसेच जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले ह.भ. प.चंद्रकांत (महाराज) मोहनराव जगताप (वय- ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्यामागे पत्नी,३ मुलगे, सुना नातवंडे असा परिवार असून सांगवी हिमा ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुरेश जगताप यांची ते भाऊ होत.