सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोर्हाळे बुद्रुक : प्रमोद पानसरे
कोर्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे विहिरीवरील विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या एका ३४ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
निलेश सोपान अडागळे (वय ३४ वर्षे) रा. कोर्हाळे बुद्रुक (ता. बारामती) असे शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना १५ ऑगस्ट २०२५ रोजी घडली. शेतामधील विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले असता विद्युत शॉक बसून ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी शितल, मुलगी अदिती (वय १० वर्षे) व मुलगा अर्णव (वय ७ वर्षे) असा परिवार आहे. वडील सोपान अडागळे हे निवृत्त एसटी कंडक्टर आहेत. कुटुंब वारकरी संप्रदायाशी जोडलेले असून, हरिभक्त परायण किर्तनकार गणेश सोपान अडागळे हे निलेश यांचे बंधू आहेत. नवजीवन तरुण मंडळाचा निलेश हा संस्थापक अध्यक्ष होता, युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण कोर्हाळे बुद्रुक व पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.