सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
नोकरीच्या मागे न धावता तरुणांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू करावेत.व्यवसायातून प्रगती करता येते.व्यवसाय करताना ग्राहकांच्या पसंतीकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे.व्यवसायामुळे समाजात नावलौकिकता मिळवता येते.आयुष्यात कुटुंबाची प्रगती करावयाची असेल तर तरुणांनी विविध व्यवसायात झोकून द्यावे असे प्रतिपादन माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भोरला चौपाटी नजिक नवीनच सुरू झालेल्या भोर खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे यांच्या नक्षत्र लॉन्स हॉटेलला दिलेल्या भेटीवेळी तसेच हॉटेल उद्घाटन प्रसंगी तरुणांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन करताना आमदार थोपटे रविवार दि.२४ रोजी ते बोलत होते.थोपटे पुढे म्हणाले नवीन नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.तर व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी कष्टाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे ग्राहकांना सेवा द्यावी.व्यवसायात उत्तुंग भरारी घेऊन मोठ्या व्यवसायात रूपांतर करता येईल.तरुणांनी कमी भांडवलात जास्तीत जास्त नफा मिळवून व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे,माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे,रमेश चव्हाण,डीवायएसपी गणेश किंद्रे,माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार,उद्योजक संतोष ढूमे,संपत दरेकर,मधुकर कानडे,दिलीप वरे,अतुल शेडगे,अतुल किंद्रे,दत्तात्रय कांबळे,रमेश फणसे उपस्थित होते.