Bhor Breaking l अज्ञान वाहनाची दुचाकीला धडक...! खानापूर-जेधेवाडी येथील २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू : पुणे-सातारा महामार्गावरील केळवडे येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
वीसगाव खोऱ्यातील जेधेवाडी (खानापूर ) ता.भोर येथील नरेंद्र किसन बदक (वय - २४) हा तरुण दुचाकीवरून रविवार दि.२४ रोजी पुणे येथून भोर बाजूकडे मित्रासमवेत येत होता. पुणे-सातारा महामार्गावरील केळवडे, नसरापूर हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला ठोकर दिल्याने नरेंद्र याचा अपघाती मृत्यू झाला.
  स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र बदक जेधेवाडी( खानापूर )येथील गरीब कुटुंबातील मुलगा होता.तो भोर येथे दुचाकी दुरुस्तीचे काम शिकत होता. नरेंद्र शांत,संयमी व मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याच्या मृत्यूने वीसगाव खोरे परिसरातील मित्र अप्तेष्ट यांच्याकडून हळहळ व्यक्त होत आहेत.
                                
Tags
To Top