सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात वारंवार वीज खंडित होण्याच्या पार्श्वभूमीवर भोर तालुका फोटोग्राफर संघटनेच्यावतीने शुक्रवार दि.२२ रोजी शहरातील महावितरणच्या कार्यालयासमोर अधिकाऱ्यांना खराब फोटोंचा हार देवून फोटोग्राफर संघटनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले.
वारंवार वीज खंडित होणे,सात-तास शटडाऊन ठेवणे इत्यादी गोष्टींमुळे शहरातील सर्वच व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत.त्यातून फोटोग्राफी हा व्यवसाय पूर्ण लाईटवर अवलंबून असताना शहरात वारंवार लाईट जात असते.त्यामुळे फोटोग्राफी व्यवसायावर परिणाम झाला असून खंडित विजयमुळे प्रिंट खराब होणे, कम्प्युटर प्रिंटर खराब होणे या गोष्टी होत आहेत.या त्रासाला कंटाळून भोर तालुका फोटोग्राफर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एमएसईबीचे अधिकारी अविनाश वाघमारे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर फोटोग्राफर व्यवसायाच्या समस्या मांडल्या.त्यांना खराब झालेल्या फोटोंचा हार देऊन सन्मान केला.एम एस ई बी च्या अधिकाऱ्यांनी यावर लवकरच तोडगा काढून सर्व समस्यांचे निवारण करू असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी संघटनेचे सारंग शेटे ,प्रशांत कांटे,
असलम आतार,संतोष म्हस्के,तोसिफ आतार,अनिस आतार,श्रीशान भालेराव,संतोष चऱ्हाटे आदींसह फोटोग्राफर उपस्थित होते.