सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
वीसगाव खोरे पंचक्रोशीच्या मध्य ठिकाणावरील नेरे ता.भोर ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करा तर गावात विनाशकारी गोष्टी आज्ञातांकडून घडवून आणल्या जात आहेत.या गोष्टींना पायबंद घाला अन्यथा आंदोलन छेडू असा सज्जड इशारा देत भोर पोलिसंना ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले.
ग्रामपंचायत नेरे हद्दीत अनेक प्रकारचे अवैध धंदे जसे की दारू धंदे चालवणे,जलजीवन योजनेअंतर्गत नवीन पाणी योजना गावात चालू असून या पाणीपुरवठा योजनेत अडथळा आणणे, योजनेची पाईपलाईन तोडणे, फोडणे, पाईप कापणे, बसवलेले वॉल चोरणे,वॉल तोडून सुरळीत चाललेल्या पाणीपुरवठा योजनेत अडसर करणे या गोष्टी अज्ञातांकडून घडत आहेत.अनेक वेळा ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये तसेच ग्रामसभेत व गावच्या बैठकीत हा विषय वारंवार चर्चेत घेण्यात आला आहे.तरी यावर तोडगा निघाला नाही.या गोष्टी गावपातळीवर थांबवता आल्या नाहीत.नागरिक हतबल झाले आहेत.तरी अज्ञात व्यक्तींवर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करून कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.लवकरच अवैध धंदे चालवणाऱ्या व्यक्तींवर व गावात जबाबदारपणे वागून समाजात तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणारा आज्ञातांवर गुन्हे दाखल केले जातील असे पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांनी सांगितले.निवेदन ठाणे अंमलदार सुनील चव्हाण यांच्याकडे दिले.यावेळी उद्योजक अनिल सावले, सरपंच उज्वला बढे,उपसरपंच दिलीप पाटणे,अनिता शेलार,रमल सावले,राजेंद्र चिकने,शिवाजी पाटणे,प्रकाश मैंद, सुदाम सावले, प्रदीप बदक,प्रकाश पाटणे,किरण सावले,श्याम सावले,श्याम चव्हाण,नवनाथ बढे, विनोद बढे,संभाजी बढे,अंकुश सावले,बापू सावले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.