Javali Breaking l सरताळे येथील राज इंडीयन लॉजवर सुरू होता वेश्याव्यवसाय : पोलिसांनी छापा टाकत केली चार पीडितांची सुटका....स्थानिक गुन्हे शाखेची तिघांवर कारवाई...

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----       
मेढा : ओंकार साखरे
सरताळे ता. जावली येथिल राज इंडीयन हॉटेल / लॉजवर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्फत धाड टाकण्यात आली. यावेळी ४ पिडीतांची सुटका करण्यात येवून तीन इसमांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मेढा पोलीस ठाण्यातुन देण्यात आली.
              याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२८ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती नुसार सरताळे ता. जावली जि. सातारा गावचे हद्दीतील राज इंडीयन हॉटेल/लॉज चालक मालक यांनी वेश्यागमनाकरीता मुली ठेवल्या आहेत व ते मागणी केले प्रमाणे त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरवितात अशी माहिती प्राप्त झालेली होती.  त्याप्रमाणे पथकाने सरताळे गावचे हद्दीतील राज इंडीयन हॉटेल/लॉज येथे छापा टाकून वेश्यागमनाचा मोबदला खतःच्या उपजिविकेसाठी स्विकारुन, पिडीत महिलांना ग्राहकांसाठी वेश्यागमनासाठी उदयुक्त करुन, वेश्या व्यवसायाच्या कमाईतील मिळकतीवर अवलंबून राहून, वेश्या व्यवसायास प्रेरणा देणारा लॉज मालक सचिन तुकाराम भिसे, सुरज नंदकुमार भिसे दोन्ही रा. सरताळे यांना ताब्यात घेवून रावेश शेट्टी रा.उडपी कर्नाटक (फरार) यांचे विरुध्द मेढा पोलीस ठाणे गु.र.नं.१३८/२०२५ भा.न्या.सं.क १४३(२), १४४(२) सह मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून ४ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
            पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे वाई पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, अश्विनी पाटील मेढा पोलीस ठाणे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस अंमलदार शरद बेबले, प्रविण फडतरे, अरुण पाटील, शिवाजी गुरव, विक्रम पिसाळ, मोनाली निकम, क्रांती निकम मेढा पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार जनार्दन गायकवाड, रफिक शेख, नंदकुमार कचरे, विजय शिदोलकर, वाई पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार श्रवण राठोड, नितीन कदम यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
To Top