Dam Update l भाटघर @ १०० टक्के...! वीर धरणातून निरा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला : नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
निरा खोऱ्यातील धारणांची शंभरीकडे वाटचाल सुरू असून भाटघर धरण काल १०० टक्के भरले असून काल भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उचलले असून वीर धरणात येणारा पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे वीर धरणातून दुपारी १२ वाजता निरा नदीपात्रात ६ हजार २०० क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 
         सद्या निरा देवघर ९८.२० टक्के, भाटघर १०० टक्के वीर ७४ टक्के तर गुंजवणी ७६ टक्के भरले असून पावसाचा जोर वाढल्याने भाटघर मधून ५१००  क्यूसेसने वीर धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर वीर मधून निरा नदीत ६ हजार २०० क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
To Top