सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भिगवण : प्रतिनिधी
दिवसेंदिवस महाराष्ट्रात ऊस कारखाने वाढत असून साखर सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते तेच अजित पवार आता माळेगाव सहकारी साखर कारखाण्याचे चेअरमन ऊस दर पाडण्यासाठी झाले झाले असून याचा परिणाम ऊस दरावर होणार असल्याचे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले.
डिकसळ (ता.इंदापूर) येथे शेतकरी संघटनेची शनिवार (दि,९) रोजी ऊस व दूध परिषद पार पडली. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांना आणखीनच कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न करत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य प्रकारे भाव मिळावा २००९ व १० साली ऊसाला दुप्पट भाव उसाला मिळत होता मात्र गेली सतरा वर्ष उसाचा भाव स्थिर आहे सरकारने ऊसाला भाव तरी द्यावा अन्यथा दोन कारखान्यांमधील अंतर कमी करावे म्हणजे दुसरा कारखाना आल्यावर आम्ही त्यांच्याकडून योग्य प्रकारे भाव घेवू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी २०१५ साली गोवंश हत्या कायदा अस्तित्वात आणल्याने अनावश्यक जनावरे विकली जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असून दहा वर्षांपूर्वी शेतमालाला भाऊ उत्तम होता , किमान दुधाचे भेसळ जरी थांबली तर दुधाला भाव योग्य मिळेल यासाठी सरकारने पहिला कायदा रद्द करून दुसरा कायदा अस्तित्वात आणल्याने सहजासहजी पैसे भरून भेसळ करणारे इसम सुटत असल्याने हा कायदा सरकारच्या फायद्यासाठी बनलेला आहे तसेच एक लिटर गाईच्या दुधात एक लिटर डिझेल व एक लिटर म्हशीच्या पैशात एक लिटर पेट्रोल यावे ही मागणी त्यांनी केली यावेळी निवृत्त अधिकारी
सुरेश खोपडे, डॉ चंद्रकांत कोलते , पांडुरंग रायते, शिवाजी नांदखिले,अँड, अजित काळे, कालिदास आपेट, सदिश कुरेशी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
-----------------------
ऊस व दूध दरासाठी आंदोलन उभारणार
महाराष्ट्रात उसाला व दुधाला योग्य बाजारभाव मिळत नाही लवकर यासाठी मोठे आंदोलन सुरू करणार असल्याचे स्पष्ट करत यासाठी ऊस व दूध परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले.