सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील शेटेवाडी येथील अक्षदा नरेश शेटे हिने एव्हिएशन क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून अक्षदाने पुण्यात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंडिगो या नामांकित एव्हिएशन कंपनीत एअर होस्टेस म्हणून स्थान मिळवले. अक्षदाचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
अक्षताने दिल्ली येथे आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून येत्या २५ ऑगस्टपासून ती इंडिगो एअरलाईन्समध्ये कार्यरत होणार आहे.तिच्या या यशामुळे शहरात तसेच शेटेवाडी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.अक्षदा छाया नरेश शेटे ही हवाई सुंदरी झाली आहे.अक्षदा माजी उपनगराध्यक्ष किसनराव शेटे यांची असून तिचा सन्मान उन्नती महिला प्रतिष्ठान आणि ब्लू स्टार डिजिटल नेटवर्क भोर यांनी केला.यावेळी उन्नती महिला प्रतिष्ठानचे अध्यक्षा सीमा तनपुरे,शहिदा आत्तार,मीना चव्हाण,शोभा गोसावी,भाग्यश्री वरटे छाया शेटे तसेच ब्लू स्टारचे सलीम आतार,माजी नगरसेवक निसार नालबंद माजी उपनगराध्यक्ष किसन वीर विनायक (मामा) तनपुरे उपस्थित होते.