सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) च्या स्थापनेला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सोमेश्वर येथील महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या हद्दीत, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने मान्यताप्राप्त एमकेसीएल प्रशिक्षण संस्थांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वृक्षारोपणाचा उपक्रम म्हणजे सोमेश्वर परिसराच्या वैभवामध्ये भर घालणारा उपक्रम आहे. असे प्रतिपादन बारामती पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप धापटे यांनी केले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या स्थापना दिनाला या २० ऑगस्ट २०२५ रोजी २५ वर्ष पुर्ण झाले. या रौप्यमहोत्सवी स्थापना दिनाच्या निमित्ताने आज योगेश सोळस्कर, प्रमोद पानसरे, नितीन भोसले यांनी दहा हजार रुपयांची विविध जुन्या देशी झाडांची रोपे आणून त्या रोपांचे वृक्षारोपण शेतकरी कृती समितीचे मदन काकडे, बारामती पंचायत समितीचे मा.सभापती प्रदिप धापटे, बारामती येथील डाटाबेस कॉम्प्युटरचे राजेंद्र कुंभार, बारामती मुख्याध्यापक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदिप जगताप, बारामती मेडिकल कॉलेजचे तानाजी कारंडे, डॉ. गणेश जगताप, चंद्रशेखर जगताप, निलेश जगताप, राजाभाऊ पानसरे, गणेश शिंदे राजु बडदे, संतोष शेंडकर, प्राजक्ता पवार, वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड, डी. वाय. जगताप, रोहिदास कोरे, राजु बालगुडे, प्रिया कॉम्प्युटर कोऱ्हाळेचे प्रमोद पानसरे, समर्थ कॉम्प्युटरचे योगेश सोळसकर आणि पार्थ यादव, नीरा येथील गणेश कॉम्प्युटर चे नितीन भोसले आणि वंदना भोसले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केले. याप्रसंगी राजाभाऊ पानसरे, वडगाव निंबाळकर यांनी वृक्षारोपण करण्यासाठी १५ झाडे दिली. याप्रसंगी वनरक्षक माया काळे, वन कर्मचारी नवनाथ रासकर, नंदकुमार गायकवाड यांनी वृक्षरोपणास सहकार्य केले