सोमेश्वर रिपोर्टर टीम----
यवत : प्रतिनिधी
पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले.
पुणे सोलापूर महामार्गावर दि. २० रोजी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. यामध्ये अशोक विश्वनाथ थोरबोले वय ५७ वर्ष रा. उरळी कांचन ता. हवेली जि. पुणे, मुळ रा. गोजवडा ता. वाशी जि. धाराशिव व गणेश धनंजय दोरगे, वय २८ वर्षे रा. यवत रावबाचीवाडी ता. दौंड, जि. पुणे यांचा मृत्यू झाला आहे.