सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
ग्राम गौरव प्रतिष्ठान पाणी पंचायत संस्थेच्या ५१ वर्षपूर्ती निमित्त स्थापना दिन साजरा करत असताना ग्राम गौरव प्रतिष्ठान स्थापना दिनाची पार्श्वभूमी कै. विलासराव साळुंखे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या हिमांशू कुलकर्णी (ACWADAM) आणि आरोग्य क्षेत्रात कुसुम मोडक यांना तसेच प्रेरणा पुरस्कार प्रशांत कुंभारकर (पाणी), श्रीमती. कल्पना धाडवे (आरोग्य), तुषार पापळ (प्रक्रिया उद्योग ) यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक सावंत
(चीफ मेंटोर एमकेसीएल) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणामध्ये भारतातील सद्यस्थिती तसेच लोकल ते ग्लोबल पातळीवर, शाश्वत विकास,कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अयात कर वाढीच्या निर्णयामुळे शेतीमालावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. तसेच अमेरिकन सोयाबीन भारतामध्ये आले तर विदर्भातील हजारो एकर क्षेत्रावर असणारे सोयाबीनच्या पीकावर व डेअरी प्रोडक्ट असणाऱ्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात भाव वाढीवर दुष्परिणाम होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI Technology ) मुळे युवकांना नोकऱ्या कशा मिळणार ? सध्या जागतिक पातळीवर सर्वच ठिकाणी AI च्या मुळे आयटी क्षेत्रातील तसेच गावातील व शहरातील युवकांना रोजगार मिळने कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून ग्रीन जॉब निर्माण करणे महत्वाचे ठरेल. यामध्ये ग्रीन एनर्जी, इको व्हिलेज सिस्टीम, रिन्यूअल एनर्जी, बायोडायव्हर्सिटी या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. यातून साधारणता पुढील काळात 14 कोटी रोजगार निर्मिती होईल. असे दिसून येत आहे. मागच्या पिढीने पृथ्वीचा विध्वंस करायला सुरुवात केली. ती सध्या आपल्या पिढीने पुनरुज्जीवीत करणे आपले कर्तव्य आहे. यासाठी जैविक शेती, सोलर एनर्जी तसेच ग्रीन एनर्जी आणि वेस्ट मॅनेजमेंट या विषयांवर काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मधूनच पुढील काळात युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी मांडले. या कार्यक्रमातील पाहुण्यांची ओळख व स्वागत कार्यकारी विश्वस्त डॉ. सोनाली शिंदे यांनी केले. या वेळी संस्थेचे विश्वस्त कल्पना साळुंखे व अनिल काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे विश्वस्त प्रसाद सेवेकरी यांनी केली. तसेच संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील पुरंदर व सातारा भागातील कामांचा आढावा प्रशांत बोरावके, योगेश मगर, सागर भोंडे, वैद्य. प्रज्वल झेंडे यांनी सादर केला. मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत, एक्क्युरेट इंडस्ट्रीज चे किरण जाधव उपस्थित होते. तसेच गावांतून शेतकरी, सरपंच, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, CSR कंपन्यांचे प्रतिनिधी आणि हितचिंतक उपस्थित होते.
या वेळी जैवविविधता केंद्राचे भूमिपूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशांत बोरावके यांनी केले.