सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना कार्यक्रमात ११५३ जणांना लाभ देण्यात आल्याची माहिती तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार निवास ढाणे म्हणाले की राजगड तालुक्यातील अडवली येथे महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा व दीप प्रज्वलित करून करण्यात आली. त्यानंतर आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते संगायो विभाग, पुरवठा विभाग, विविध दाखले, कृषी विभागामार्फत औजरे वाटप यांचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले.
दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात १५३ लोकांनी विविध योजनांचा लाभ घेतला. यावेळी प्रांत अधिकारी विकास खरात, महेश हरिचंद्रे,तहसीलदार निवास ढाणे निवासी नायब तहसीलदार मयूर बनसोडे, गटविकास अधिकारी मंडल अधिकारी राजपाल यादव, पुरवठा अधिकारी उत्तम आगलावे, प्रसाद धायगावे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका निर्मला जागडे,राष्टवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष किरण राऊत, गोपाळ इंगुळकर, संदीप खुटवड, संतोष वालगुडे, निलेश खामकर,, अमोल नलावडे, मोनिका बांदल, आदीसह तलाठी, ग्रामसेवक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते,
फोटोसाठी ओळ --- अडवली (ता.राजगड) आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले
महाराज महाराजस्व अभियानात दिलेले लाभार्थी पुढील प्रमाणे
1) कृषी विभाग 90
2) मंडळ अधिकारी 371
3) आधार नोंदणी 40
4) पुरवठा विभाग 78
5) संजय गांधी 37
6) आरोग्य सेवा 376
7) महावितरण 15
8) ग्रामपंचायत 34
9) महा इसेवा 95
10) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा 6
11) स्वच्छ भारत मिशन 5
12) शिक्षण 6