Sabhasaar AI ! सरपंचापासून ते ग्रामसेवकापर्यंत ! ग्रामपंचायतीवर असणार थेट केंद्र सरकारची नजर : काय आहे 'सभासार' प्रणाली

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नवी दिल्ली : प्रतिनिधी
ग्रामीण भारताच्या शासनव्यवस्थेत हायटेक क्रांती घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने 'सभासार' प्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे. 
          या प्रणालीद्वारे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कारभारावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने देखरेख ठेवली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
सभासार प्रणाली काय आहे?
'सभासार' ही एआयसंचलित बैठक सारांश प्रणाली आहे. यामध्ये ग्रामपंचायतींच्या बैठकीचे इतिवृत्त, घेतलेले निर्णय, त्यांचे डेटा विश्लेषण या सर्व गोष्टींची नोंद एआयद्वारे केली जाईल. यामुळे बैठकींचे रेकॉर्डिंग, रिपोर्टिंग आणि पारदर्शकता वाढेल. ग्रामविकास निधीचा योग्य वापर झाला का, घेतलेले निर्णय अंमलात आले का, यावर थेट देखरेख ठेवता येईल.
To Top